श्लोक डिसले यास प्राईड ऑफ स्पंदन अवॉर्ड जाहीर
तळमावले/वार्ताहर महाराष्ट्र शासन, धर्मादाय आयुक्त कार्यालय संलग्न आणि आंतरराष्ट्रीय आयएसओ मानांकन प्राप्त पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने देण्यात येणारा प्राईड ऑफ स्पंदन अवॉर्ड माईंगडेवाडी, (जिंती) येथील श्लोक लव डिसले यांना जाहीर झाला असल्याची माहिती ट्रस्टचे संस्थापक/अध्यक्ष संदीप डाकवे यांनी दिली आहे. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, ग्रंथ आणि कोल्हापूरी फेटा असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शनिवार दि.25 ऑक्टोबर, 2025 रोजी हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. इ.5वी मध्ये शिकत असलेल्या श्लोक डिसले याने जय जय स्वामी समर्थ, काव्यांजली, निवेदिता माझी ताई, पिंगा ग पोरी पिंगा या मालिका, व्हॅनिश ॲड, शासकीय जाहिरात, झीबा बासमती राईस इ.जाहिराती, राक्षस, शक्तिमान मुले युक्तिमान, मातृत्व, रामायण, खेळ नाटकाचा इ.नाटके, कूटनीती, दृष्टिकोन, वाचाल तर वाचाल, पत्रास कारण की इ.शॉर्ट फिल्म्स मध्ये अभिनय केला आहे. कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमात स्व.राजाराम डाकवे (तात्य...