Posts

Showing posts from March, 2025

अक्षय चव्हाण यांच्याकडून सर्वधर्म समभाव संदेश

Image
  कराड/वार्ताहर  चैत्र वर्ष गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या निमित्ताने सर्वधर्म समभावाचा संदेश अक्षय चव्हाण यांनी रमजान ईद निमित्ताने मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. जात, धर्म, वंश, भाषा जरी अनेक असल्या तरी आपण सर्व भारतीय एक आहोत आपल्या देशामध्ये अनेक जाती धर्माचे बंधू व भगिनी राहत असतात. त्यातच रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. अशातच सर्व धर्म समभाव जात, पात न बघता माणुसकी जपूया असा संदेश रयत विद्यार्थी विचार मंच पश्चिम महाराष्ट्र प्रभारी अध्यक्ष अक्षय चव्हाण यांनी रमजान ईद निमित्ताने मुस्लिम बांधवांना दिल्या.

लोटळेवाडी येथे साजरा होणार श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकटदिन सोहळा

Image
तळमावले/वार्ताहर                     श्री स्वामी समर्थ प्रकटदिनानिमित्त पाटण तालुक्यातील लोटळेवाडी (काळगांव) येथील श्री स्वामी समर्थ सेवाश्रम (मठ) येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मठामध्ये सालाबादाप्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकटदिन सोहळा सोमवार दिनांक 31 मार्च रोजी साजरा होत आहे. यंदा श्री स्वामी समर्थ सेवा सांप्रदाय ट्रस्ट चे रौप्यमहोत्सवी वर्ष असल्यामुळे भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.                सोमवार दि.31 मार्च, 2025 रोजी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत महिलांकरिता हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी डाॅ.सौ.सारिका गावडे, काळगांव ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.राखीताई काळे यांची प्रमुख उपस्थिती आहे. त्यानंतर माजी विश्वस्त स्त सदस्यांचा विशेष सन्मान सोहळा आयोजित केला आहे. यासाठी प्र.प्राचार्य ए.बी.कणसे, जिल्हा नियोजन समिती सदस्य संजय देसाई, मा.सुभाषराव बावडेकर, मा.वसंतराव शिरसट व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.       ...

कराड तालुक्याच्या बामणवाडीतील लक्ष्मी देवीची यात्रा १ एप्रिल रोजी

Image
मुंबई/शंकर कडव यांचेकडून...                 कराड तालुक्यातील कराड- ढेबेवाडी रोडवर तारूखजवळ असलेल्या आदर्श गाव बामणवाडीत ग्रामदेवता श्री लक्ष्मीदेवीची वार्षिक यात्रा मंगळवार १ एप्रिल रोजी पारंपरिक जल्लोषात साजरी होणार आहे.त्यानिमित्त बामणवाडी  ग्रामस्थांच्यावतीने अखंड हरिनाम सप्ताह सोहळा २३ मार्चपासून सुरू झाला आहे.  या ज्ञानेश्वरी पारायण  सोहळ्यात दररोज काकड आरती,पांडुरंगाची पूजा, ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचन, हरिपाठ,कीर्तन आदी कार्यक्रम होत आहेत. महाराष्ट्रातील नामवंत  कीर्तनकारांच्या कीर्तन सेवेला भाविकांचा मोठा प्रतिसाद दिसून येत आहे. रविवार ३० मार्च रोजी सकाळी माऊलींच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक, १० वाजता काल्याचे कीर्तन  होऊन पारायणाची सांगता होणार आहे.त्यानंतर दुसर्‍या दिवशी यात्रेनिमित्त सोमवार ३१ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता नैवेद्य व औषधाचा म्हणजेच फटाक्याच्या आतिषबाजीचा कार्यक्रम  आणि वगनाट्य तमाशाचा कार्यक्रम होणार आहे.तसेच मंगळवार १ एप्रिल रोजी लक्ष्मीदेवीची पालखी मिरवणूक,दुपारी तमाशा आणि सायंकाळी कुस्त्य...

जयभीम कांबळे महाराष्ट्र उद्योजकता पुरस्काराचे मानकरी

Image
तळमावले/वार्ताहर                उद्योग क्षेत्रात अतुलनीय कामगिरी बद्दल महाराष्ट्र उद्योजकता पुरस्कार २०२५ हा भव्य दिव्य सोहळा नाशिक या ठिकाणी नुकताच पार पडला. यामध्ये सातारा जिल्ह्यातून सौर ऊर्जा प्रकल्प उभारणारी सोलर पॉवर व्हिजन कंपनीच्या कामगिरीबद्दल जयभीम कांबळे यांना मराठी अभिनेत्री वर्षा उसगावकर मॅडम यांच्या हस्ते महाराष्ट्र उद्योजकता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी युको बँकेचे डीजीएम आणि झोनल अधिकारी अमलेश त्रिपाठी, जीएसटी चे सहाय्यक आयुक्त चेतनसिंग रजपूत यांची उपस्थिती होती.                  जयभीम कांबळे यांनी पुणे,सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर जिल्ह्यात सौर ऊर्जेच्या माध्यमातून शासनाच्या पर्यावरणपूरक सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी आपल्या कंपनीच्या माध्यमातून चांगली कामगिरी केली आहे.   या पुरस्काराबद्दल जयभीम कांबळे यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.

डाकेवाडी प्रिमीयर लीग मध्ये पूर्वा स्ट्राईकर्स विजेता तर स्पंदन सांची सुपरस्टार उपविजेता संघ

Image
तळमावले/वार्ताहर पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथे पार पडलेल्या दोन दिवसीय डाकेवाडी प्रिमीयर लीग पर्व 3 मध्ये पूर्वा स्ट्राईकर्स संघ विजेता, स्पंदन-सांची सुपरस्टार संघ उपविजेता तर त्रिमुर्ती फायटर्स संघ तृतीय पारितोषिकाचा मानकरी ठरला. प्रथम क्रमांकासाठी रु.वीस हजार व चषक, व्दितीय क्रमांकासाठी रु.पंधरा हजार व चषक आणि तृतीय क्रमांकासाठी रु.दहा हजार आणि चषक मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्यांना संघांना प्रदान करण्यात आले. या प्रीमियर लीगमध्ये राजवीर किंगमेकर 11-(संघमालक, शिवाजी डाकवे), पुर्वा स्ट्राईकर्स (संघमालक, रमेश जाधव), त्रिमुर्ती फायटर्स (संघमालक, कृष्णा चिंचुलकर), साल्वी फायटर्स (संघमालक, रविंद्र डाकवे), आरोही फायटर्स (संघमालक, शरद डाकवे), स्पंदन-सांची सुपरस्टार (संघमालक, डाॅ.संदीप डाकवे) हे सहा संघ सहभागी झाले होते.  या डाकेवाडी प्रिमीयर लिगच्या तिसऱ्या पर्वात 202 धावा आणि 4 बळी घेणारा प्रमोद डाकवे मिस्टर डिपीएल आणि बेस्ट बॅटर, सर्वाधिक 9 विकेट घेणारा नितीन डाकवे बेस्ट बाॅलर, 25 षटकार मारणारा अमित मस्कर सिक्सर किंग, सुंदर क्षेत्ररक्षण करणारा कृष्णा डाकवे तर उत्कृष्ट झे...

रघुनाथ रामचंद्र माटेकर यांचे निधन

Image
तळमावले/वार्ताहर                चिखलेवाडी (ता.पाटण) येथील रघुनाथ रामचंद्र माटेकर यांचे गुरुवार दि.13 मार्च, 2025 रोजी निधन झाले. आप्पा या नावाने ते परिसरात परिचित होते. पाटण तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य आणि चिखलेवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच होते. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे ते कट्टर समर्थक होत. त्यांच्या पश्चात त्यांच्या घरी पत्नी, एक मुलगा, दोन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे.                 त्यांचा दशक्रिया विधी शनिवार दि. 22 मार्च, 2025 रोजी तर उत्तरक्रिया विधी मंगळवार दि.25 मार्च, 2025 रोजी मु.पो.चिखलेवाडी, ता.पाटण, जि.सातारा येथे होणार आहे. मनमिळावू स्वभावाचे व्यक्तिमत्त्व असल्याने त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कु.शौर्या कदम राज्यात तृतीय

Image
  पाटण/वार्ताहर  ध्येय प्रकाशन ॲकडमी महाराष्ट्र यांच्या वतीने जानेवारी महिन्यात घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत सुयश मेडिकल अँड चॅरिटेबल सोसायटी संचलित,रघुकुल बालमंदिर व प्राथमिक विद्यालय नाडे नवारस्ता या विद्यालयातील इयत्ता २री मध्ये शिकत असणारी कु. शौर्या संतोष कदम ही विद्यार्थिनी राज्य गुणवत्ता यादीत तिसरी आलेली आहे, याबद्दल तिचे  रघुकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष  मा.डॉ.श्री.विजय देसाई सर,संस्थेचे सचिव मा.सौ. डॉ.रूपाली देसाई मॅडम, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. सविता सुर्वे , मार्गदर्शक शिक्षक श्री.महेश पाटील सर, विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग,आजी माजी विद्यार्थी पालक  यांनी तिचे अभिनंदन केले, व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि. कॉलेज काळगावमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

Image
  काळगाव /वार्ताहर    शनिवार दि. 8 मार्च 2025 रोजी सकाळी ठीक 9.30 वाजता  विद्यालयामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त काळगाव पंचक्रोशीतील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या माता- भगिनींचा सन्मान सोहळा प्राचार्य श्री कांबळे ए. पी. यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला.                 कार्यक्रमास प्रमुख पाहुणे  श्री. भगवान गोविंद रणदिवे (महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सदस्य) हे होते. प्रमुख उपस्थिती मध्ये श्री.अजय भिवा कांबळे ( कार्यकर्ता- अंधश्रद्धा निर्मूलन समिती), श्री भिंगारदेवे सर (मुख्याध्यापक जि.प.प्राथमिक शाळा काळगाव)श्री.पाटील सर (मुख्याध्यापक जि.प.प्राथमिक शाळा लोहारवाडी), काळगाव च्या सरपंच सौ. राखीताई काळे व उपस्थित सर्व महिला यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ, रयत माऊली सौ. लक्ष्मीबाई पाटील, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.                  विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ.जाधव एम. एस.मॅडम यांनी क...

शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी केेले डाॅ.संदीप डाकवे यांचे कौतुक

Image
तळमावले/वार्ताहर सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शबनम मुजावर व उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) रविंद्र खंदारे यांनी शेतीमित्र डाॅ.संदीप डाकवे यांच्या अक्षरगणेशाचे कौतुक केले. याप्रसंगी त्यांच्यासमवेत शिक्षणविस्तार अधिकारी संभाजी कानवटे, दैवता साळुंखे व इतर मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, शबनम मुजावर आणि रविंद्र खंदारे यानी डाॅ.संदीप डाकवे यांच्या कलेची व सामाजिक क्षेत्रातील कार्याची माहिती घेतली. ‘‘खूप छान, आपली कला खूपच सुंदर आहे, आपणांस खूप खूप शुभेच्छा’’ अशा शब्दात शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी यांनी डाॅ.डाकवे यांचे कौतुक केले. डाॅ.संदीप डाकवे यांनी यापूर्वी विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्तिंना स्केच, शब्दचित्र, रेखाचित्र, ठिपके चित्र, स्क्रिबलिंग चित्र इ. कलाकृती भेट दिल्या आहेत. डाॅ.संदीप डाकवे यांनी कला जोपासत स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून शाळेला स्कुल बॅग-संगणक वाटप, मोफत वहया वाटप, एक वही एक पेन उपक्रम, ग्रंथतुला करुन पुस्तकांचे वाटप, माणूसकीच्या वहया, ज्ञानाची शिदोरी, गणवेश वाटप, शाळेला महापुरुषांच्या प्रतिमांचे वाटप, अंगणवाडी रंगकाम व बोलक्या भिंती, ...