Posts

Showing posts from December, 2024

देश निर्मीत मध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे मोठे योगदान - प्राचार्य दिलीपराव संकपाळ

Image
  तळमावले दि.३० डिसेंबर                काकासाहेब चव्हाण कॉलेज तळमावले ता पाटण जि सातारा राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिर मौजे महिंद ता पाटण जि सातारा दि.३० डिसेंबर २४ ते दि.५ जाने २५ अखेर संपन्न होत आहे.. आजचे १ ले पुष्प उद्घाटन कार्यक्रम सायं ४ वा  संपन्न झाला.. कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा परिषद केंद्र शाळा महिंद च्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक लेझीम पथकाने वाजत गाजत रा.से.यो.विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या कार्यक्रमाचे उद्घाटक, प्रमुख पाहुणे आणि मान्यवर मंडळी यांचे व्यासपीठाकडे आगमन करण्यात आले...                  प्रमुख पाहुणे -मा श्री प्राचार्य दिलीपराव संकपाळ (आजीव सेवक सदस्य श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर), उद्घाटक - मा श्री महेश पाटील (सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक बनपुरी) , अध्यक्ष - मा डॉ उषादेवी साळुंखे (प्रभारी प्राचार्य,के.सी.कॉलेज, तळमावले) प्रमुख उपस्थित - मा सौ नंदा शेंडगे(लोकनियुक्त सरपंच महिंद), मा सुरेश शेंडगे(उद्योजक, सातारा),मा विकास गोस...

मातीतल्या लोकांनी केलेला सन्मान लाखमोलाचा : कविता राम

Image
तळमावले/वार्ताहर गावाकडच्या आपल्या मातीतील लोकांनी केलेला सन्मान लाखमोलाचा आहे, त्याची तुलना होवू शकत नाही असे भावनिक उद्गार सुप्रसिध्द पार्श्वगायिका कविता राम यांनी काढले. त्या पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील ‘स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट’ च्या वतीने देण्यात येणाया राज्यस्तरीय प्राईड ऑफ स्पंदन अवॉर्ड पुरस्कार वितरणानंतर संवाद साधताना बोलत होत्या. कुंभारगांव (ता.पाटण) जवळील एका छोटयाशा गावातील असलेल्या कविता राम यांनी चंदेरी दुनियेत आपल्या जादुई आवाजाने वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक दिग्गजांसमवेत त्यांनी आपली कला सादर केली आहे. मालिका टायटल साॅंग, चित्रपटातील गाणी त्यांच्या आवाजाने खुलली आहेत. चंदेरी दुनियेत आपले वेगळे स्थान निर्माण केलेल्या कविता राम यांनी आपली गावाशी असलेली नाळ मात्र जपली आहे. कविता राम या समाजभान जपणाया सेलिब्रिटी असून त्यांनी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट च्या अनेक उपक्रमात आपले योगदान दिले आहे. याशिवाय सोशल मिडीयाच्या माध्यमातून ट्रस्ट च्या उपक्रमाचे कौतुक करत असतात. तसेच त्यांनी देखील समर्पण फाउंडेशनच्या माध्यमातून गरजूंना मदत करत आहेत. ‘स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट’ च...