शासन व शेतकऱ्यांमधील कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी हा दुवा : अँड.प्रकाश पाटील
राज्यात शासकीय पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांची संख्या खूप व असून त्यांच्या ज्ञानाचा फायदा उर्वरित शेतकऱ्यांना करून देण्याची आज गरज आहे. त्यामुळे संघाने वेळोवेळी शासनाकडे मागणी केलेल्या आणि रास्त असलेल्या मागण्या मान्य झाल्यास शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाला काम करताना पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा मध्यस्थ म्हणून उपयोग करून घेता येईल.असे शासकिय कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष ऍड प्रकाश पाटील यांनी राहुरी विद्यापीठाजवलील हिंदुस्थान ऍग्रो च्या प्रांगणात संघाच्या एक दिवसीय अधिवेशनात बोलताना मांडले.कार्यक्रमासाठी मा एकनाथजी शिंदे हे उपस्थित राहणार होते.परंतु त्यांच्या डोळ्याचे ऑपरेशन झालेमुळे त्यांचा दौरा रद्द झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार सदाशिव लोखंडे होते. शासनाच्या विविध समित्या, शासकीय धोरण व त्या संबंधित समित्या वर राज्यातील पुरस्कार प्राप्त शेतकाऱ्यांना प्राधान्याने प्रतिनिधित्व देण्याची आज गरज असून हेच पुरस्कार प्राप्त शेतकरी शासनाचे धोरण तळागाळापर्यंत पोहोचवू शकतील, त्यासाठी त्यांच्या मान्य करण्याची मागणी अधिवेशनात करण्यात आली.यासोबतच ...