Posts

Showing posts from August, 2023

काकासाहेब चव्हाण कॉलेज मध्ये रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न

Image
तळमावले/वार्ताहर काकासाहेब चव्हाण कॉलेज,तळमावले या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजना, सांस्कृतिक आणि क्रिडा विभागाअंतर्गत वांग व्हँली वसतिगृहातील मुलांना महाविद्यालयातील विद्यार्थींनी स्वतः बनविलेल्या राखी तयार करून  रक्षाबंधनाच्या सणाच्या निमित्ताने कॉलेज मधील विद्यार्थ्यींनीने या वसतिगृहातील मुलांना राखी बांधून बहिण आणि भाऊ प्रेमांचे आणि काळजीचे ,स्नेह बंधाचे प्रकटीकरण करण्यात आले. या सणाच्या निमित्ताने असे म्हटले जाते कि , " राखी एक प्रेमाचे प्रतिक आहे , राखी एक विश्वास आहे ,तुमच्या रक्षणार्थ मी सदैव सज्ज असेल हाच विश्वास रक्षाबंधनाच्या या पवित्र दिनी मी सर्व भगिनींना देऊ इच्छितु "  या कार्यक्रमाचे नियोजन रा से यो विभागातील प्रकल्प अधिकारी व सदस्य यांनी केले यामध्ये प्रा महेश चव्हाण, प्रा संभाजी नाईक,  प्रा सी जी पुटवाड, प्रा सौ ज्योती बाऊचकर, प्रा सचिन पुजारी यांनी केले. तसेच या राखी बनविण्यासाठीचे ट्रेनिंग देण्याचे काम कॉमर्स विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.उषादेवी साळुंखे व त्यांच्या टिमने केले आहे. हा कार्यक्रम यशस्वी प्राचार्य डॉ अरूण गाडे, सर्व गुरूदेव कार्यकर्तै व विद्यार्थ्य...

डॉ. सोमनाथ गिते यांच्या कार्याचा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड कडून गौरव

Image
पुणे/वार्ताहर                व्यसनमुक्ती विषयावर अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या डॉ. सोमनाथ गिते यांच्या कार्याचा गौरव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड २०२३, युनिक वर्ल्ड रेकॉर्ड या संस्थांनी घेतली आहे. INDIA'S WORLD RECORDS मध्ये अगोदरच त्यांच्या नावावर विक्रम नोंदवला गेला आहे.                समुपदेशन, वर्तमानपत्रं, मासिक, सोशल माध्यमांतून जनजागृती करत समाजात व्यसनमुक्ती चळवळीचे काम डॉ. सोमनाथ गिते यांनी केले आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले असून यापूर्वी त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानाची आणि या क्षेत्रातील त्यांनी केलेल्या अभ्यासाची दखल घेत विश्वकर्मा युनिव्हर्सिटी फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंटकडून डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. तसेच, व्यसनमुक्ती गौरव पुरस्कार २०२२, राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार २०२२, राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार २०२२ असे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.           माजी राज्यपाल भगतसिंग कोश...

कराड येथे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत कार्यशाळा संपन्न

Image
कराड/प्रतिनिधी कराड येथे भाग्यश्री पवार (जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सातारा), संतोषकुमार बरकडे (कृषी उपसंचालक), रियाज मुल्ला उपविभागीय (कृषी अधिकारी कराड), समीर पवार (तंत्र अधिकारी विस्तार), कोमल घोडके (प्र.तालुका कृषी अधिकारी कराड),  संदीप डाकवे (पत्रकार) यांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत कार्यशाळा संपन्न झाली. उपस्थित लाभार्थी यांना व्यवसाय निवड, प्रशिक्षण, मार्केटिंग यासंदर्भात कराड तालुक्यातील महिला पुरुष शेतकरी लाभार्थीना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच कराड तालुका येथील जिल्हा संसाधन व्यक्ती अभिजित किर्दत व नितीन सावंत यांनी अर्ज करण्यासंदर्भात माहिती दिली.