येळेवाडी येथे श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे आयोजन
तळमावले/वार्ताहर पाटण तालुक्यातील येळेवाडी (काळगांव) येथे रामनवमी, हनुमान जयंतीच्या निमित्ताने सामुदायिक श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व मंदिराचा 10 वा वर्धापन दिन सोहळयाचे आयोजन केले आहे. सदर पारायण सोहळयाचे हे 20 वे वर्ष आहे. श्री सद्गुरु योगीराज हरिहर महाराज, श्री सद्गुरु रामानंद महाराज, श्री सद्गुरु ज्ञानेश्वर माऊली सपकाळवाडी यांच्या प्रेरणेने ह.भ.प.जितेंद्र महाराज आवारे, ह.भ.प.बाबुराव महाराज सलते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. पारायण सोहळयाचे कलश पुजन अॅड.विठ्ठलराव येळवे, विनापुजन बाबुराव मस्कर, ग्रंथ पुजन बाजीराव येळवे, ध्वज पुजन सुरेश येळवे तर मुर्तीपुजन अमित येळवे यांच्या हस्ते होणार आहे. मृदंगाचार्य ह.भ.प. जितेंद्र महाराज आवारे, नारायण महाराज सलते, हरिओम आवारे व श्री माऊली मृदंग वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व विद्यार्थी, गायनाचार्य संगीत विशारद ह.भ.प.बाबुराव महाराज सलते, नारायण महाराज सलते, जितेंद्र महाराज आवरे, दादा महाराज खडके, हुनमान महाराज खडके, तर काकडा यासाठी बाबुराव महाराज सलते, नारायण महाराज सलते, पांडूरंग महाराज सलते व सलतेवाडी म...