दौलतनगर येथे शनिवार दि. 25 फेब्रुवारीला सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचेकरीता कार्यशाळेचे आयोजन
दौलतनगर दि .23 :- पाटण विधानसभा मतदारसंघातील सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांना ग्रामपंचायतीचा कारभार चांगल्या पध्दतीने करण्याबरोबर राज्य शासनाच्या विविध योजना ह्या ग्रामस्तराव प्रभावीपणे राबविण्याच्या उद्देशाने पाटण विधानसभा मतदारसंघातील सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांची एकदिवशीय कार्यशाळा शनिवार दि. 25 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 10.00 वा. महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर येथे आयोजित केली आहे. या एकदिवशीय कार्यशाळेचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते होणार आहे.यावेळी सातारा जिल्हयाचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी व सातारा जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत. या एकदिवशीय कार्यशाळेच्या पहिल्या प्रशिक्षण सत्रामध्ये...