Posts

Showing posts from October, 2025

पत्रकार विद्या मोरे यांची अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या उपजिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

Image
कराड ( वार्ताहर) कराड येथील News Bharat 24 च्या ब्युरो चीफ आणि Daily Latest News च्या प्रतिनिधी पत्रकार विद्या मोरे यांची अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या सातारा जिल्हा उपजिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अमरावती येथे पार पडलेल्या संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. या बैठकीस केंद्रीय अध्यक्ष मनोहरराव सुने, केंद्रीय कार्याध्यक्ष युसुफ खान, केंद्रीय महासचिव सुरेशराव सवळे, केंद्रीय उपाध्यक्ष राजेंद्र भुरे, केंद्रीय संपर्कप्रमुख रवींद्र मेंढे, सातारा जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे ,सातारा जिल्ह्याचे माजी उपजिल्हाध्यक्ष नितीन मोरे उपस्थित होते. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलास बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार ही नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीबद्दल कराड ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी पत्रकार विद्या मोरे यांचे अभिनंदन केले. तसेच आमदार डॉ. अतुल बाबा भोसले, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, माजी आमदार बाळासाहेब पाटील, माजी आमदार आनंदराव पाटील, माजी राज्यपाल व खासदार श्रीनिवासजी पाटील, रयत कारखान्याचे चेअरमन उदय...

धामणीमध्ये सेवानिवृत्त सैनिकांची जंगी मिरवणूक व स्वागत

Image
धामणी/वार्ताहर            धामणी, ता - पाटण , जि- सातारा येथील सेवानिवृत नायक सुभेदार श्री . रविंद्र शामराव लोकरे यांचा सेवानिवृत्ती सोहळा जंगी मिरवणुक काढून मोठया आनंदात , उत्साहात , दिमाखात साजरा करण्यात आला .         धामणी गावचे सुपुत्र श्री रविंद्र शामराव लोकरे हे भारतीय सैन्य दलातून देशाची २४ वर्षाची प्रदीर्घ पुर्ण सेवा करून २४ ऑक्टोंबर ला धामणी गावामध्ये आले . २१ सप्टेंबर २००१ ला सैन्यात भरती झालेपासुन आपल्या सेवाकाळात भारतातील सीमारेषा सुरक्षित ठेवण्याचा मोठया जोखमीचे कर्तव्य यशस्वीरित्या पुर्ण केले .युनिट २१६ मध्यम तोफखाना मधून सुरुवातीचे तोफखाना गनचे १० महिन्याने  ट्रेनिंग हैद्राबाद , नाशिक येथे घेतले .  त्यानंतर अरुणाचल प्रदेश टेंगा तवांग चायना बॉर्डर , कुपवाडा, पठ्ठण बारामुल्ला जम्मू काश्मीर , पंजाब पटियाला , कारगिल द्रास सेक्टर , भुसावळ महाराष्ट्र , दुग्रुमुल्ला जम्मु काश्मीर , हरितकोट पंजाब , नाशिक याठिकाणी भारतभूमीची २४ वर्षाची प्रदिर्घ सेवा केली .देश हाक मारेल तिथं धावून जाऊन देशातील कानाकोपऱ्यात प्रतिकुल परिस्थित...

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

Image
कराड/वार्ताहर          मराठा साम्राज्याची राजधानी व सैनिकांचा जिल्हा म्हणून नावलौकिक मिळवलेला शूरवीरांचा जिल्हा म्हणजे सातारा. त्यातीलच एक 36 मराठा माध्यमिक धुवाधार तोफखान्याचा राजधानी ग्रुप सातारा आहे. तोफखान्याच्या माध्यमातून स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला. त्याला प्रत्येक वर्षी प्रचंड प्रतिसाद,  वाढता उत्साह आणि त्यातूनच सर्वांना सकारात्मक ऊर्जा मिळत आहे. या मेळाव्यामध्ये आजी-माजी सैनिकांबरोबरच त्यांच्या मित्रमंडळींना, पै पाहुण्यांना तसेच नातलगांना आमंत्रित करून खऱ्या अर्थाने सैनिकांप्रती देशाप्रती जनजागृती करण्याचे अलौकिक असे कार्य राजधानी ग्रुप सातारा तर्फे केले जात आहे. स्नेहसंमेलनासाठी आलेल्या आजी-माजी सैनिकांच्या पै पाहुण्यांना, नातलगांना, सैनिकी जीवनातील सैनिकांप्रती एक- दुसऱ्याच्या प्रति असलेला आदर-सत्कार, मैत्री आणि राष्ट्र तसेच देशावर असलेले देशप्रेम पाहून आलेल्या प्रत्येक पाहुण्यांना खरंच सातारा जिल्ह्याची दिवसेंदिवस घटती सैन्य संख्या, याला वाचा फोडणारी परंपरा शूरवीरांचा जिल्हा किंवा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी आपणही भारतीय...

जर्मनी देशात जाऊन योगेशने मिळवलेल्या यशाचा आम्हाला अभिमान - संतोष कदम

Image
                 योगेश हणमंत कदम हा पाटण तालुक्यातील माईंगडेवाडी गावचा सुपुत्र सह्याद्री नगर चारकोप कांदिवली येथे वास्तव्यास असून प्रचंड मेहनती हुशार आणि जिद्दी युवा आहे आपल्याला चांगले घडायचे असेल काहितरी नवीन करायचं असेल आणि उज्वल भविष्य घडवायचं असेल तर ते चांगलं शिक्षण घेऊनच होऊ शकत त्याची जिद्द आणि वडिलांची साथ त्याला लाभली त्याने शिक्षणासाठी थेट जर्मनी गाठली                 खुप संघर्ष करत शिक्षण चालू ठेवलं बर्लिन या जर्मनीच्या राजधानीत एमबीए इन एनर्जी मॅनेजमेंट ही पदवी प्राप्त केली आणि आपल्या भारत देशात आला तेव्हा छत्रपती संभाजीराजे महाराज यांच्या स्वराज्य पक्षाचे मुंबई युवक अध्यक्ष संतोष कदम यांनी त्यांचा सत्कार केला सोबत तानाजी कदम उपस्थित होते            योगेश कदम यांचे सर्वत्र कौतुक होत आहे स्वराज्य पक्ष सरचिटणीस धनंजय भाऊ जाधव यांनीही कौतुक केले योगेशचा अनेक ठिकाणी  सत्कार सोहळा मोठ्या प्रमाणात होत आहेत भविष्यात योगेश कदम हा युवकांसाठी प्र...