Posts

Showing posts from June, 2025

हुश्श...झाली....एकदा काळगांव परिसरात धुळवाफेवरील पेरणीला सुरुवात

Image
  तळमावले/वार्ताहर मे महिन्यातील 20 तारखेपासून अगदी काल परवापर्यंत अवकाळी पावसाने सर्वत्र दाणादाण उडवून टाकली. त्यामुळे बळीराजाला मे महिन्यात पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला अजिबात वेळ मिळाला नाही. दोन तीन दिवसापूर्वी पाऊस उघडल्याने शेतकरी वर्ग शेतीच्या कामात गुंतला आहे. रविवार दि.8 जून पासून मृग नक्षत्र सुरु झाल्याने शेतकरी वर्ग चिंतीत होता. परंतू पावसाने उघडीप दिल्याने काळगांव विभागात सध्या धुळवाफेवरील पेरणीची लगबग सुरु असलेली दिसून येत आहे. त्यामुळे शेतशिवार अगदी माणसांनी गजबजून गेला आहे. शेतामध्ये खते टाकणे, शेतीतील पालापाचोळा गोळा करणे,  बांध धरणे, घरात लाकडे भरणे, वैरण घरात भरणे इ. सर्व कामे यावेळी रखडली होती. ती हातघाईवर आली आहे. एरवी उन्हाळयातच धूळवाफेवरील पेरणी केली जाते. यामध्ये भात, भुईमूग, सोयाबीन, मका इ.पीके घेतली जातात. परंतू यावेळी धूळवाफेवरील पेरणी झाली नाही. दोन दिवसापूर्वी या परिसरात चांगला पाऊस झाला. त्यामुळे लोकांनी पेरणीची कामे युध्दपातळीवर सुरु केली आहेत. नांगर, कुळव, पाटे, कुरी, बांडगे इ. पारंपारिक शेती औजारांच्या सहाय्याने लोक शेती करत आहेत. क्वचितच रोटर, ...

शिबेवाडीत साकारलेय पाटण तालुक्यातील सर्वात मोठे शेततळे

Image
तळमावले/वार्ताहर पाटण तालुक्यातील शिबेवाडी (वरची) गुढे येथील माळरानावर एक अवाढव्य शेततळे साकारले आहे. डोंगरावरील सुमारे 25 लोकांनी एकत्र येवून आई काळंबा देवी ॲग्रो  या कंपनीची निर्मिती केली आहे. त्यांनी अथक परिश्रमातून हे शेततळे तयार केले आहे. या शेततळयाचा आकार 80 बाय 65 मीटर आहे. त्याचा शुभारंभ दि. 6 मार्च, 2025 रोजी शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार ॲड.जनार्दन बोत्रे यांच्या हस्ते झाला. सुमारे 3 महीने दिवस काम सुरु होते. 100 कामगार यामध्ये काम करत होते. या शेततळयामध्ये 2.5 कोटी लिटर पाण्याचा संचय होणार असून त्यामुळे 35 एकर क्षेत्र पाण्याखाली येणार आहे. हे शेततळे ग्रॅव्हीटीच्या उतारावरील पाण्याने भरणार आहे. सदर शेततळे हे पाटण तालुक्यातील सर्वात मोठे असल्याचा दावा या शेतकऱ्यांनी केला आहे. शिबेवाडी ते कोळपे माळ-मारुती मंदीर या ठिकाणचा पाणंद रस्त्याला निधी राज्याचे पर्यटन मंत्री आणि जिल्हयाचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी दिल्यामुळे शेततळयाचे काम करण्यास गती मिळाली आहे.  या शेततळयातील पाण्याचे पुजन नुकतेच जागतिक पर्यावरण दिन आणि गंगादशहरा समाप्ती दिनादिवशी मोठया उत्साहात झाले. ...