Posts

Showing posts from October, 2024

शासनाच्या शेतीमित्र पुरस्काराबद्दल डाॅ.संदीप डाकवे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

Image
  तळमावले/वार्ताहर महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषि विभागाचा पत्रकारितेचा सर्वोच्च वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार मिळाल्याबद्दल पाटण तालुक्याचा अभिमान ठरलेले डाकेवाडी (काळगांव) येथील डाॅ.संदीप डाकवे यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून, फोन, मेसेज, व्हाॅटसअप, इन्स्टाग्राम तसेच सोशल मिडीयाव्दारे डाॅ.डाकवे यांच्या कर्तृत्वाचे मनापासून कौतुक केले आहे. तळमावले (ता.पाटण) येथे शिवसमर्थ परिवाराच्यावतीने शाल, बुके व श्रीफळ देवून डाॅ.संदीप डाकवे यांचा सत्कार शिवसमर्थ समुहाचे कुटूंबप्रमुख अॅड.जनार्दन बोत्रे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष शिवाजी सुर्वे, सीईओ हेमंत तुपे, सुनील ढेंबरे, व्यवस्थापक नितीन पाटील, देवबा वायचळ व शिवसमर्थ मुख्य कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी वर्ग उपस्थित होते. आधार फौंडेशनचे रामभाऊ कोळेकर यांनी फ्रेम देवून डाॅ.संदीप डाकवे यांचा सत्कार आई गयाबाई डाकवे, रेश्मा डाकवे, पायल कोळेकर, रोहित पवार, अक्षता निवडूंगे, पुजा निकम, स्पंदन डाकवे, सांची डाकवे, साईशा कोळेकर व मान्यवरांच्या उपस्थितीत केला.  वरची शिबेवाडी...

राजेश नवलू बोडके यांचे निधन

Image
मुंबई/वार्ताहर जाईचीवाडी (ता.पाटण) येथील राजेष नवलू बोडके यांचे शुक्रवार दि.11 ऑक्टोंबर, 2024 रोजी वयाच्या अवघ्या 23 वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. कामानिमित्त ते कामोठे या ठिकाणी वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात त्यांच्या त्यांच्या घरी आई, वडील, भाऊ वहिनी, बहीण दाजी असा मोठा परिवार आहे. त्यांचा रक्षाविसर्जन विधी रविवार दि. 13 ऑक्टोंबर, 2024 रोजी सकाळी 9.00 वाजता जाईचीवाडी, ता.पाटण, जि.सातारा येथे घेण्यात येणार आहे. मनमिळावू स्वभावाचे व्यक्तिमत्त्व असल्याने त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कृषी सहाय्यक सचिन जाधव यांचा राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते कृषी सेवा रत्न पुरस्कार देऊन सन्मान

Image
फलटण/स्पंदन एक्स्प्रेस वृत्तसेवा  महाराष्ट्र शासनाचा पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवा रत्न पुरस्कार सचिन जाधव सासकल कृषि सहाय्यक  फलटण जिल्हा सातारा यांचा सी पी राधाकृष्णन राज्यपाल महाराष्ट्र राज्य  यांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला यावेळी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व कृषिमंत्री धनंजय मुंढे व मा प्रधान सचिव जयश्री भोज भा.प्र.से, मा आयुक्त कृषी रवींद्र बनवडे भा.प्र.से मा कैलास मोते फलोत्पादन  संचालक महाराष्ट्र राज्य, तसेच संचालक, विनयकुमार आवटे विकास पाटील, सुनील बोरकर,आणि अंकुश माने सहसंचालक या मान्यवरांच्या उपस्थित मध्ये नॅशनल स्पोर्ट्स क्लब  वरळी मुंबई गौरव करण्यात आला. सातारा जिल्यातील पाहिले कृषि सेवा रत्न मिळवण्याचा मान मिळवला आहे.  महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च पुरस्कार म्हणून      कृषि विभागा कडून दिला जाणारा हा पुरस्कार आहे. या पुरस्काराबद्दल  उमेश पाटील विभागीय कृषी सहसंचालक कोल्हापूर विभाग कोल्हापूर, जिल्हा आधीक्षक कृषि अधिकारी सातारा भाग्यश्री फरांदे,उपविभागीय कृषि अधिकारी फलटण सुहास रनसिंग, तालुका कृषि...