Posts

Showing posts from October, 2023

ग्रामीण कथाकार पांडूरंग काशिनाथ पतंगे यांचे निधन

Image
तळमावले/वार्ताहर कुंभारगांव (ता.पाटण) येथील पांडूरंग काशिनाथ पतंगे यांचे बुधवार दि.18 ऑक्टोबर, 2023 रोजी निधन झाले. त्यांचे वय 83 वर्षे होते. ‘आप्पा’ या नावाने ते परिसरात परिचित होते. पांडूरंग या स्वतःच्या नावातील ‘रंग’ आणि वडिलांच्या काशिनाथ या नावातील ‘नाथ’ हा शब्द असे ‘रंगनाथ’ पतंगे या नावाने ते लेखन करीत होते. रंगनाथ पतंगे हे उत्कृ ग्रामीण कथा लिहीत. कुंभारगांव येथे झालेल्या साहित्य संमेलनात त्यांचा गौरव झाला होता. नामवंत दिवाळी अंकामधून त्यांच्या कथा प्रसिध्द झाल्या होत्या. परिसरातील अनेक दिवाळी अंकांना ते विनामूल्य कथा देत असत. त्यांच्या लेखनाचा एक वाचक वर्ग तयार झाला होता. त्यांच्या अनेक कथांना विविध पारितोषिके मिळाली आहेत. त्यांची भाशाशैली काळजाला हात घालणारी अशी होती. जुन्या काळात घडलेल्या अनेक घटनांचे प्रतिबिंब त्यांच्या कथांमधून वाचायला मिळत असे. गेले काही दिवसापासून ते आजारी होते. परंतू त्यांचा लिहण्याचा व्यासंग प्रचंड होता. 200 पेक्षा जास्त कथा त्यांनी लिहल्या आहेत. आकाशवाणीवरही त्यांच्या लिखाणाचे वाचन झाले आहे.  कुंभारगांव येथे के.एन.पतंगे या नावाने त्यांनी कपडयाचा व्...

'झी टाॅकीज’ वर सादर होणार गुढे येथील काळंबादेवीची गाथा

Image
तळमावले/वार्ताहर                     पाटण तालुक्यातील वरची शिबेवाडी गुढे येथील नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या श्री काळंबादेवीची गाथा झी टाॅकीज या वाहिनीवर वर दिसणार आहे. झी टाॅकीज प्रस्तुत "गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा" या कार्यक्रमात नवरात्री विशेष मध्ये साध्वी अनुराधा दिदी यांचा कथा महोत्सव होत आहे. या मध्ये देवींची महती सांगितली जाणार आहे. निसर्गरम्य वातावरण असलेल्या श्री क्षेत्र शिबेवाडी येथील श्री काळंबादेवी मंदिर परिसरामध्ये नुकतेच झी टाॅकीजच्या टीमने चित्रीकरण केले आहे. या कार्यक्रमाचे निवेदन सुप्रसिध्द अभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी केले आहे. शुभम प्रोडक्शन चे दिग्दर्शक हेमंत पांचाळ यांनी या कार्यक्रमाचे दिग्दर्शन केले आहे. कीर्तनकार ह.भ.प.संगीताताई येनपुरे यांनी या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केेले. विशेष म्हणजे झी टाॅकीजवर दिसणारा तळमावले हा पहिलाच कार्यक्रम आहे.                या कार्यक्रमाचे प्रक्षेपण झी टाॅकीज या वाहिनीवर शुक्रवार दि.13 ऑक्टोबर मंगळवार दि.24 ऑक...