Posts

Showing posts from April, 2023

बनूबाई धोंडिबा डाकवे यांचे निधन

Image
  तळमावले/वार्ताहर मस्करवाडी, काळगांव (ता.पाटण) येथील बनूबाई धोंडिबा डाकवे यांचे बुधवार दि. 19 एप्रिल, 2023 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, पाच मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा रक्षाविसर्जन विधी शुक्रवार दि. 21 एप्रिल, 2023 रोजी सकाळी 9 वाजता मस्करवाडी, काळगांव ता.पाटण, जि.सातारा येथे घेण्यात येणार आहे. मनमिळावू आणि प्रेमळ स्वभावाचे व्यक्तिमत्त्व असल्याने त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मुलींना ठेवपावती देवून जपल्या आईच्या स्मृती

Image
तळमावले/वार्ताहर दोन वर्षापूर्वी दिनकर रामिष्टे यांच्या आईचे आकस्मात निधन झाले. त्यामुळे रामिष्टे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. आईचे निधनाचे दुःख बाजूला ठेवून रामिष्टे परिवाराने जपलेली सामाजिक बांधिकली समाजाला दिशा देणारी आहे. आईच्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांनी आपल्या गावामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक मुलीच्या नावावर प्रत्येकी रु.1000 ची दामदुप्पटची ठेवपावती करण्याचा संकल्प केला आहे. या ठेवपावती देवून दिनकर रामिष्टे यांनी आपल्या आईच्या स्मृती चिरंतन जपण्याचा प्रयत्न केला आहे. सदर ठेवपावतीमुळे मुलींच्या उज्जवल भविष्यासाठी नक्कीच हातभार लागेल. याप्रसंगी ठेवपावती स्वीकारलेल्या मुलींच्या परिवारातील सदस्यांनी रामिष्टे परिवाराचे आभार मानले आहेत.आतापर्यंत सुमारे 20 मुलींच्या नावे त्यांनी ठेवपावती केली आहे. काही दिवसापुर्वी दिनकर रामिष्टे यांच्या आईचे व्दितीय पुण्यस्मरण झाले. यावेळी रामिष्टे परिवाराने काळेवाडी, रामिष्टेवाडी या वाडीत जन्मलेल्या मुलींच्या नावावर रु.1000 ची दामदुप्पट ठेवपावती करून त्या कुटुंबातील सदस्यांना सुपुर्द केली. तसेच अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा, हायस्कूल, पतसंस्था इ.ना ...