Posts

Showing posts from January, 2023

तळमावलेत 25 वर्षानंतर पुन्हा भरला दहावीचा वर्ग

Image
तळमावले/वार्ताहर                पाटण तालुक्यातील तळमावले येथील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आणि उत्तम विद्यार्थी घडवण्याची परंपरा असलेल्या श्री वाल्मिकी विद्यामंदीर मधील 1996-97 साली दहावी पास झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा वर्ग 25 वर्षानंतर पुन्हा भरला. यानिमित्त 19996-97 रोजीच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी रौप्य महोत्सवी स्नेहमेळावा साजरा केला.                कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद, डाॅ.बापूजी साळुंखे, संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे, काकासाहेब चव्हाण यांच्या प्रतिमांचे पुजन व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी श्री वाल्मिकी विद्यामंदीर मधील विद्यार्थ्यांनी सुमधूर असे स्वागत गीत सादर केले. तद्नंतर सर्व विद्यार्थ्यांनी सद्या आपण काय करत आहे, कोणत्या पदावर कुठे असतो याची ओळख परेड सर्वांसमोर करुन दिली. पंचवीस वर्षानंतर आपल्या शाळेत एकमेकांना आणि आपल्या शिक्षकांना भेटून सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनी आणि शिक्षक-शिक्षिका जुन्या आठवणींना उजाळा देत अगदी रममाण होऊन गेले हो...

स्वराज्य रक्षणासाठी मृत्युला हसत हसत कवटाळणारा महापराक्रमी योध्दा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज

Image
तळमावले/वार्ताहर           स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांना लहान वयात आई आणि तारुण्यामध्ये  आजीच्या (राजमाता जिजाऊ)  प्रेमाला मायेला पारखे  व्हावे लागले. त्यांना आयुष्यात  अनंत अडचणींना सामोरे जावे लागले.   4 संस्कृत ग्रंथांचे लेखक, 13 भाषांचे जाणकार असणारे संभाजी राजे प्रचंड हुशार, विद्वान, बहुविद्याज्ञानी होते. आपल्याविरुद्ध कट रचणाऱ्या स्वराज्य द्रोह्यांना उदार मनाने माफ करणारा, परोपकारी, दयावान राजा म्हणूनही संभाजी राजे वेगळे ठरतात. मैत्री आणि मित्रासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणारा सच्चा मित्र, शौर्यबळाने शत्रूचाही थरकाप उडविणारा, स्वराज्य रक्षणासाठी मृत्यूला हसत -हसत कवटाळणारा, 'बाप से बेटा सवाई ' ही म्हण सार्थ करणारा महापराक्रमी राजा म्हणजे संभाजी महाराज होत असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. उल्हास माळकर यांनी केले.                 श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित काकासाहेब चव्हाण कॉलेज, तळमावले येथे श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहानिमित्त सांस्कृतिक विभाग...

आरोग्याची संपत्ती जपली पाहीजे - ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर

Image
तळमावले/वार्ताहर           लोकांनी सेंद्रीय शेतीकडे वळले पाहीजे. आरोग्य ही संपत्ती आहे ती जपली पाहिजे यासाठी तरुणांनी व्यसनापासून दूर रहावे असे मत समाजप्रबोधनकार, महाराष्ट्र भूषण, विनोदाचार्य ह.भ.प.निवृत्ती महाराज (देशमुख) इंदुरीकर यांनी व्यक्त केले. ते पाटण तालुक्यातील निर्मलग्राम पाचुपतेवाडी (गुढे) येथील कै.विठ्ठल ज्ञानू मराठे व कै.गंगुबाई विठ्ठल मराठे यांचे पुण्यस्मरणार्थ आनंदा विठ्ठल मराठे यांनी आयोजित केलेल्या कीर्तन सोहळयात बोलत होते.           आज 50 टक्केपेक्षा जास्त लोक कॅन्सर या आजाराने त्रस्त आहेत. केमीकलयुक्त आहार खाल्यामुळे हा आजार होत आहे. त्यासाठी योग्य, सकस आहार घेणे गरजेचे आहे. सेंद्रीय शेती ही काळाची गरज आहे. त्यामुळे लोकांनी सेंद्रीय शेतीकडे वळले पाहिजे. ह.भ.प.निवृत्ती महाराज यांनी दैनंदिन जीवनातील उदाहरणे सांगत लोकांना खळखळून हसवलेच आणि काही भावनिक प्रसंग कथन करुन लोकांच्या डोळयात पाणीदेखील आणले. सहज सोप्या शब्दात लोकांना समजेल अशा भाषेत त्यांनी कीर्तनाला घेतलेल्या अभंगाचे निरुपण केले.      ...

कै.आनंदा बाबुराव मोहिते यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त कीर्तनाचे आयोजन

Image
तळमावले/वार्ताहर                     पाटण तालुक्यातील पाटीलवाडी (कुंभारगाव) येथील आनंदा बाबुराव मोहिते यांचे तृतीय पुण्यस्मरण बुधवार दि.11 जानेवारी, 2023 रोजी येत आहे. त्यास्मृतीप्रित्यर्थ बुधवार दि.11 जानेवारी, 2023 रोजी सायंकाळी 6 ते 9 या वेळेत शिरोली बु.ता.जुन्नर जि.पुणे येथील सुप्रसिध्द कीर्तनकार ह.भ.प.डाॅ.गजानन महाराज काळे यांच्या कीर्तनाचे आयोजन केले असल्याची माहिती मोहितेे परिवाराने दिली आहे. यासाठी ह.भ.प.धर्माचार्य अॅड.शंकर महाराज शेवाळे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.                     गजानन महाराज यांनी कुलस्वामी खंडेराय चरित्र कथा या प्रबंधासाठी डाॅक्टरेट मिळाली आहे. कार्तीकी एकादशीनिमित्त सहयाद्री वाहिनीवर, जगदगुरु तुकाराम महाराज यांच्या अभंगावर 'झी टाॅकीज' या वाहिनीवर ह.भ.प.गजानन महाराज यांनी अनेक कीर्तने केली आहे. तर श्री कुलस्वामी खंडेराय यांच्यावर आठ दिवस झी टाॅकीज वर चरित्र कथा सांगितल्या आहेत. वरची पाटीलवाडी (कुंभारगांव) ता.पाटण, जि.सातारा येथे आयोजि...

व्हाटसअपच्या माध्यमातून एकत्र येत शाळेला केली मदत

Image
तळमावले/वार्ताहर                 सध्या मोबाईल वापरणारे व्हाटसअप वापरत नाही असे लोक अपवादात्मक आढळतील. या व्हाटसअप मधून अनेक चांगली कामे होत असतात. अशाच एका ग्रुपच्या माध्यमातून 1996 च्या दहावीच्या विधार्थ्यांना एकत्र आणण्याची किमया केली धामणी येथील अंकुश सावंत, विनायक पुजारी यांनी. कार्यक्रमासाठी लागणारे सर्वप्रकारचे सर्व नियोजन त्यांनी केले होते.त्यांना ग्रुपमधील इतरही मुला मुलींनी मदत केली. केवळ एकत्र न येता शाळेला फुल ना फुलाची पाकळी म्हणून रु.11,111/- रोख मदत देवून शाळेच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न केला.                                    "क्लासमेंट्स", "आपलं गावं आणि आपली शाळा" यांच्या सहकार्याने न्यू इंग्लिश स्कूल धामणी येथे माजी विद्यार्थी स्नेह संमेलन सोहळा नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक थोरात सर हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका बी.आर.पाचूपते यांनी केले. एच. ए...