सतिश मित्रा, तुझा अभिमान वाटतो...! सन 2000 ला मी 10 वी पास झालो. पुढील शिक्षणासाठी तळमावले येथील काकासाहेब चव्हाण काॅलेजला प्रवेश घेतला. ग्रामीण भागातून आाल्यामुळे मी तसा बावरलेल्या अवस्थेतच होतो. याचकाळात माझी कुंभारगांवाच्या सतिश शेटे या मुलाची ओळख झाली. अतिशय चुणचुणीत आणि हुशार असा हा मुलगा. त्याची अन् माझी घटट् मैत्री जमली. त्याच्या सोबतच दिनेश खटावकर, सचिन चोरेगे, अमोल मोरे, सचिन कदम इ. चांगले मित्र मिळाले. सतिशला माझी चित्रकला आवडायची. सतिशच्या घराजवळ गणेश लोकरे (सर) होते. त्यांचे ड्राॅईंग खूप छान होते. मला त्यांच्या अक्षर खूप आवडायचे. सतिशबरोबर मी नेहमी त्यांना भेटायचो. सतिश आणि माझी घरातील परिस्थिती तशी बरोबरीची असल्यामुळेच आम्ही चांगले मित्र झालो असे वाटते. 12 वी नंतर मी एटीडी ला सातारा येथे प्रवेश घेतला. तर सतिशने कुठे अॅडमिशन घेतले हे कळलेच नाही. एक दिवस तो मिलीटरीत भरती झाल्याचे कळाले खूप अभिमान वाटला. कुणाकडून तरी त्याचा पत्ता घेवून मी त्याला 1 ते 2 पत्रे लिहल्याचे आठवत आहे. त्यानंतर मात्र त्याचा संपर्क झाला नाही. मंगळवार दि 01 जून, 2021 रोजी तब्ब्ल 20 वर्षांनी सतिश...