Posts

Showing posts from February, 2026

पाटण तालुक्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा करिष्मा, झेडपी आणि पंचायत समितीत निर्विदाद वर्चस्व

Image
पाटण तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेनेने ऐतिहासिक आणि दणदणीत विजय मिळवत राजकीय वर्चस्व निर्विवादपणे सिद्ध केले आहे. या निवडणुकीत भाजपचा जनतेने अक्षरशः सुपडासाफ करत विकासाला आणि स्थानिक नेतृत्वाला कौल दिला आहे. 🟠 जिल्हा परिषद – ७ पैकी ६ गटांवर शिवसेनेचा भगवा तालुक्यातील ७ जिल्हा परिषद गटांपैकी ६ गटांवर शिवसेनेने विजय मिळवत बहुमत सिद्ध केले आहे. हेळवाक तर्फ पाटण, तारळे, मल्हारपेठ, मारुल हवेली, मंद्रुळकोळे आदी प्रमुख गटांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांनी भाजप व इतर पक्षांना मोठ्या फरकाने पराभूत केले. भाजपकडे फक्त म्हावशी गटापुरतेच समाधान उरले आहे. 🟠 पंचायत समिती – १४ पैकी १३ गणांवर शिवसेनेची एकहाती सत्ता पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेने १४ पैकी तब्बल १३ गणांवर विजय मिळवत एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. हेळवाक, येराड, मुरुड, तारळे, मल्हारपेठ, मारुल हवेली, मंद्रुळकोळे, सणबूर, नाडे, नाटोशी, काळगाव, कुंभारगाव या सर्वच भागांत शिवसेनेच्या उमेदवारांना जनतेचा भरघोस पाठिंबा मिळाला. 🗳️  पाटण तालुका – जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक : सविस्तर निकाल 🔶...