ना.शंभूराज देसाई यांचे हस्ते तळमावले स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्राचा लोकार्पण सोहळा संपन्न
दौलतनगरदि .26:- ग्रामीण भागामध्ये आरोग्याच्या चांगल्या सुविधा पुरविण्यासाठी राज्यातील महायुतीचे शासन प्रयत्नशील असून सातारा जिल्हयामध्ये स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रासारख्या चांगल्या योजना राबविण्याचे काम आपण पालकमंत्री म्हणून केले. त्यामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघातील 9 प्राथमिक आरोग्य केंद्रांचा या योजनेमध्ये समाविष्ठ करत या स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांचे कामांसाठी निधीची तरतूद करुन या कामांना प्राथमिकता दिली. सातारा जिल्हयाचा पालकमंत्री म्हणून शिक्षण,आरोग्य व पाणी पुरवठा या तीन गोष्टींना प्राधान्य दिलं. त्याचाच एक भाग म्हणून आज तळमावले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पुरविण्यात आलेल्या विविध सेवा सुविधांचा लोकार्पण सोहळा होत असून स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रामधून ग्रामीण भागामध्ये दर्जेदार आरोग्याच्या सुविधा मिळतील असा विश्वास पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला. तळमावले,ता.पाटण येथे जिल्हा वार्षिक आराखडयांतर्गत मंजूर स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र...