मंद्रुळकोळे चा आकाश पाटील मालिकेत
तळमावले/डाॅ.संदीप डाकवे पाटण तालुक्यातील ढेबेवाडी नजीक असलेल्या मंद्रुळकोळे या गावातील आकाश प्रशांत पाटील हा युवक ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत काम करत आहे. ‘स्टार प्रवाह’ या वाहिनीवर सोमवार ते शनिवार रात्री 8.30 वाजता ही मालिका प्रदर्शित होत आहे. या मालिकेतील ‘तुषार’ नावाची व्यक्तिरेखा आकाश पाटील साकारत आहे. त्याच्या या भूमिकेबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. आकाश पाटील हा मुळचा मंद्रुळकोळे येथील असणारा हा युवक वतनावरती सळवे या गावी गेला आहे. आकाश याचे प्राथमिक शिक्षण आबासाहेब चिरमुले प्राथमिक शाळेत, माध्यमिक शिक्षण महाराजा सयाजीराव विद्यालय सातारा येथे, महाविद्यालयीन शिक्षण वायसी काॅलेज येथे झाले आहे. आकाशने बी.ई.मेकॅनिकल ही पदवी ज्ञानश्री इंजिनिअरींग काॅलेज सातारा येथून घेतली आहे. घरामध्ये कलेची कोणतीही पाश्र्वभूमी नसताना टेलिव्हीजनच्या चंदेरी दुनियेत आकाश आपली वाट मोठया कष्टाने चालत आहे. शालेय जीवनापासूनच त्याला या क्षेत्राचे वेध लागले होते. शाळेत असताना गॅदरींग, छोटे मोठे कार्यक्रम यामध्ये आकाश सहभागी होत असे. पुढे महाविद्यालयीन जीवनात या आवडीला पाठबळ मिळाले. काॅलेजमधील विविध कलागुण...